विजय तेंडुलकर लिखित ' मित्राची गोष्ट ', ही गोष्ट असामान्य आहे, पात्र असामान्य आहेत आणि सादरीकरण असामान्य आहे.
बापूला मित्रा मैत्रीच्या पलीकडे आवडते, unconditional love. मित्राला स्वतःच्या लैंगिक कलेबद्दल प्रश्न असताना ती नमाच्या प्रेमात पडते, same-sex love. बापूच्या रूम पार्टनर पांड्याला मित्राचे प्रचंड आकर्षण, lustful love आणि मन्या हा नमावर पुरशी अधिकार बजावू पाहतोय, controlling love. प्रत्येक पात्राची भिन्न वेदना, वेगळाच कलह आणि न सुटणारी गुंता-गुंत. ही आताची गोष्ट आहे, २०२४ मधली. पण तेंडुलकरांची ही गोष्ट स्वातंत्र्य पूर्व काळी घडली. म्हणून ही सगळी पात्र त्या काळीही हवीत. एकच गोष्ट दोन वेग वेगळ्या काळात लोकांसमोर मांडण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ. गोष्टीला कुठेही धक्का न लावता, २ कलाकार १ पात्र सदर करत ही गोष्ट पुढे नेतात. त्यामुळे तुम्हाला २ बापू, २ नमा, २ पांडे, २ मन्या आणि २ मित्रा दिसतात - तुमच्याशी, एकमेकांशी आणि स्वतःशी बोलताना. प्रत्येक प्रेम कहाणीचा शेवट शोकांतिकाच नसतो. आपण तो बदलू शकतो, बदलायला हवा. हे रडगाणे नाही, जीवन गाणे आहे. ते गायला, बदल घडवायला आणि मित्राची गोष्ट अनुभवायला तुम्ही आवर्जूज या.
निर्मिती : Xperiments
2-3 March, Bellevue Youth Theater
Runtime: 2 hours, 15 minutes.